Jayant Patil criticizes Sensor Board On Phule Movie : ‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद (Phule Movie) निर्माण झाल्याचं समोर आलंय. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने (Sensor Board) देखील फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil) सेन्सॉर बोर्डावर टीका केलीय.
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ‘या’ तारखेला रिलीज होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी ‘फुले’ चित्रपटाच्या आक्षेपावरून नाराजी व्यक्त (Jayant Patil On Phule Movie) केली आहे. एक्स अकाऊंवर पोस्ट लिहित त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. ‘नामदेव ढसाळ कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती’, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.
‘छबी’ चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मिडिया पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी (NCP Sharad Pawar) म्हटलंय की, ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतले जात आहे, त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते. काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या प्रपोगंडावर आधारित फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. व्हु इज नामदेव ढसाळ, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात? याची कल्पना आली होती. पण आता ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
मागील काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. फुले चित्रपटाच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. फुले चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र “फुले” सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता… pic.twitter.com/T5UGUv2JSS
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 10, 2025
‘फुले’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी नुकतीच माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यांनी या विषयावर चर्चा देखील केली. ब्राह्मण संघटनांकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवण्यात आलं होतं. ‘फुले’ चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी करण्यात आली होती.