Download App

रोहित पवारांना धक्का देणाऱ्या तालुकाध्यक्षाची हकालपट्टी !

  • Written By: Last Updated:

Karjat Apmc Election: कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे. एेन बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भाजपसोबत आला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याची राष्ट्रवादीने गांभीर्याने दखल घेतली आहे. एेनवेळी पक्षाला दगा देणारे काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का; बाजार समितीच्या रणधुमाळीत तालुकाध्यक्षच फोडला !

काकासाहेब तापकीर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे यांनी उमेदवारीही दिली आहे. रोहित पवारांबरोबर ठाकरे गटाला ही राम शिंदे यांनी धक्का आहे. ठाकरे गटाचे बळीराम यादवही ही भाजपमध्ये आले आहेत. त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. राम शिंदेंचा महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रोहित पवारांना सोडून जात आहे. त्याची पक्षाने तत्काळ दखल घेतली आहे. तापकीर यांनी पक्षाविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी काढले आहे.


चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे…आमचं सरकार आलं की परतफेड होणारच

माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपप्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी रोहित पवार यांचे पॅनल आणि राम शिंदे यांच्या पॅनेलमध्ये जोरदार टक्कर आहे. त्यातून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आगामी निवडणुकांसाठी स्थानिक नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी राम शिंदे यांचे प्रयत्न आहे. काँग्रेसचे प्रवीण घुले हे राम शिंदे यांनी पक्षात घेतले होते. आता राष्ट्रवादी, ठाकरेला गटालाही शिंदे यांनी धक्का दिला आहे.

Tags

follow us