“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळत होतं. नेत्यांनाच आम्ही नको होतो असा दावा गोऱ्हे यांनी केला.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या नेत्यांनी आता ठाकरे गटातील राजकारण चव्हाट्यावर आणण्याचं ठरवलं आहे. शिंदे शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळत होतं. नेत्यांनाच आम्ही नको होतो असा दावा गोऱ्हे यांनी केला.

नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं काहीच कारण नाही. नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का असा प्रश्न गोऱ्हेंना विचारण्यात आला. यावर गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्त्याला कमी समजण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचे नियोजन करत होते.

ठाकरेंना धक्का! नगरचे शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना; आज शिंदे गटात प्रवेश

आता जास्त तपशीलात जाणार नाही. उद्धव ठाकरे गटाचे फार लोकही समोर नाहीत. त्यामुळे त्यांच्या गटाचे लोक येथे असते तर मला बोललेले अधिक आवडले असते. नेत्यांना संपर्क नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो आहोत असे समजावे. दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते असा गौप्यस्फोट डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.

यानंतर नीलम गोऱ्हे यांनी बाळासाहेबांच्याही काही आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या बाळासाहेब होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष असायचे. पण पुढे खूप बदल होत गेले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा आम्हाला धन्य वाटले. पण पुढे आमदारांना भेटी मिळणार नाहीत. दोन तीनदा आरटीपीसीआर तपासणी केली तरी भेट मिळणार नाही या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या.

Exit mobile version