टीका करत नाही, पण घाबरतही नाही; उद्धव ठाकरेंबद्दल नीलम गोऱ्हे रोखठोकच बोलल्या

Neelam Gorhe On uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अनेक तर्क-वितर्क लावले गेले. दरम्यान, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून […]

Neelam Gorhe

Neelam Gorhe

Neelam Gorhe On uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अनेक तर्क-वितर्क लावले गेले. दरम्यान, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? यावर भाष्य करतांना त्यांनी उध्दव ठाकरेंच्या कार्यपध्दतीवरच टीका केली

नीलम गोऱ्हे यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात का प्रवेश करावसा वाटला? असा प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, मी ज्या शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेची आमदार झाले. त्याच्यात नीलम गोऱ्हे, शिवसेना असा उल्लेख आहे. आजही नीलम गोऱ्हे शिवसेना असाच उल्लेख आहे. मी शिवसेना सोडलेली नाही. मी फक्त एकनाथ शिंदेच्य्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मी निर्णय घेतला. कारण, त्यानंतर रामजन्मभूमी, कलम 370, समान नागरी कायदा या मुद्दांवर बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला, एनडीएला पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेला एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट पाठिंबा देत आहे. त्यामुळं शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रियंका गांधी, शशी थरुर यांच्यासह अशोक चव्हाणांना स्थान 

यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. त्या म्हणाल्या, शिंदे विधानपरिषदेत, विधानसभेत यायचे. त्यावेळी त्यांच्याशी कामानिमित्त भेटी व्हायच्या. तेव्हा अनेकांना वाटायचं मी शिंदे गटात जाणार. मात्र, तेव्हा माझ्या डोक्यात तसं काही नव्हतं. मात्र उबाठासोबत काम करतांना जाणवत होतं की, कार्यपध्दती बललली जात नाही. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही बदल झाले नाहीत. मला उध्दव ठाकरेंवर टीका करायची नाही. मी त्यांना घाबरते असंही नाही. त्यांच्यात व्यक्तीगत दोष नाही. मात्र, कार्यपध्दतीचा विचार केला तर शिवसैनिकांना ते न्याय मिळवून देऊ शकले नाही. ना राजकीय भूमिका योग्य पध्दतीने समाजासमोर मांडू शकले. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकाण या भूमिकेतून काम झालं नाही. त्याऐवजी केवळ 20 टक्के राजकारण झालं. तेही फक्त रोज सकाळी होणार वादविवाद एवढ्या पुरतंच मर्यादित होतं, अशी टीका त्यांनी केली.

त्या म्हणाल्या, विधायक असं काही काम झालं नाही. अशा वेळी शिंदेकडून प्रस्ताव आला. मी काही समुहासाठी काम करते. मला महिलांसाठी काही भरीव काम करायचं असेल तर शिंदे-फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिदेंसोबत गेलं पाहिजे असं वाटल्यानं मी हा निर्णय घेतला.

Exit mobile version