Rahuri Assembly by Election: राहुरी व बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक (Rahuri Assembly by Election) पार पडत आहे. मात्र या निवडणुका बिनविरोध न होता दोन्ही ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसने म्हटल्यानंतर उमेदवार कोण असणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. यातच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे राहुरीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे चित्र आहे. यावरच अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठे भाष्य केले आहे प्राजक्ता तनपुरे यांच्याशी मी संपर्कात आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, वेट अँड वॉच असं म्हणत खासदार लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
अहिल्यानगर येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा बैठक पार पडली. संपर्क प्रमुख अंकुश काकडे, संदीप वर्पे, खासदार निलेश लंके, दादाभाऊ कळमकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार निलेश लंके यांनी राहुरीसह बारामती येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीवरती महत्त्वाचे भाष्य केले. लंके म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच अजित पवार यांनी काम केले आहे. त्यामुळे सुनेत्राताई यांना सर्व पक्षाने पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करावी. कारण अजित पवारांचे अकाली निधनामुळे ही निवडणूक होत आहे. अजित पवारांचे मोठे कार्य देखील त्या ठिकाणी आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या मी संपर्कात योग्य निर्णय घेऊ
राहुरीचे माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जात आहे तसा प्रचारही त्यांचा सुरू आहे. यावरती निलेश लंके म्हणाले, की मी तनपुरे यांच्या संपर्कात आहे राजकारणात योग्य वेळी योग्य डाव टाकला पाहिजे असं सूचक वक्तव्य देखील लंके यांनी केले आहे.
