Download App

कितीही वादळं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार; भाजपप्रवेशाच्या चर्चेला अमित देशमुखांकडून पूर्णविराम

  • Written By: Last Updated:

सांगली : “कितीही वादळं आली. कितीही संकटं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार’ असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूरमधील देशमुख बंधू भाजपात जाणार अशी चर्चा सुरु आहे. यावर स्वतः अमित देशमुख यांनी आज सांगलीतील विटामधील एका कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलं आहे.

भाजपनेते आमदार संभाजी निलंगेकर यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात “लातूरचे प्रिन्स हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत” असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली होती. यावेळी बोलताना निलंगेकर पुढे असं म्हणाले होते की, “ते इच्छुक असले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही.”

यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देताना म्हटलं की कितीही वादळं आली. कितीही संकटं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार. यावेळी बोलताना ते म्हणाले कि सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे किंवा सध्या तरी असं म्हणावे लागत आहे. सध्या राज्यात तिसरे सरकार सुरु आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे, दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे तर तिसरे सरकार हे सध्या सुरु आहे आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल. एकप्रकारे त्यांनी नव्या सत्ताबदलाचे संकेत दिले आहेत.

Tags

follow us