Download App

Trimbakeshwar Temple : ‘ते’ पत्र बळजबरीने लिहून घेतले; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप

No one entered the Trimbakeshwar temple by force; The game of spoiling social harmony by the rulers is on : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) निकालांमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालेला असतांनाच राज्याच्या काही भागात दंगलसदृश्य तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्योरोप केले जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील सामजिक सलोखा बिघडवण्याचा खेळ सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

अकोला, शेवगाव या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. या घटना ताज्या असतांनाच त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मंदिरात घुसण्याचा एक गटाने प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यावरून वाद उफाळून आला होता. मंदिरात घुसखोरी करणाऱ्यावर कारवाईची मागणी पुरोहित संघाने केली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाविषयी बोलतांना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा योजनाबध्द रितीने बिघडवण्याचे खेळ सुरू आहेत. आज जे सत्तेवर आहेत, ते अनैतिक मार्गाने सत्तेवर आले. नकली हिंदुत्वाचे ते भजन करत आहेत. जनतेचा पाठिंबा नसल्यानं सत्ताधारी दंगली भडवकत आहेत. हिंसाचार पेटवून राजकीय भाकरी शेकण्याचा हा प्रकार असून आहे. या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Horoscope Today, 17 May 2023 : ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

राऊत म्हणाले की, त्र्यंबकेश्वर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मी अनेकदा त्र्यंबकेश्वरला जातो. मी या घटनेची माहिती घेतली. मात्र, कोणीही मंदिरात घुसल्याची माहीती नाही. मंदिरात बळजबरीनं कुणी शिरलं नाही. मंदिर प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्याकडून मंदिरात घुसण्याचं पत्र लिहून घेतलं आहे. त्र्यंबकेश्वर घटनेवर गृहमंत्री एसआयटी नेमतात… एसआयटी कशाला नेमता… रामनवमीनंतर दंगल झाली, तेव्हा एसआयटी नेमली का? असा सवाल राऊतांनी केला.

हनी ट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याचा पुरविल्याच्या संशयावरून डॉ. कुरुलकर यांना एटीएसने 4मे रोजी अटक केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहेत, असं सांगत राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर टीका केली. या प्रकरणात एसआयटी चौकशी कधी नेमता? असा खोचक प्रश्न विचारला.

न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले आहे. नार्वेकर यांना कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर निर्णय द्यावा लागेल. दरम्यान, नार्वेकर हा निर्णय लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. शिवाय, ते सत्तेत आहेत. आणि त्यांनी शिंदे गटाच्या विरुध्द निकाल दिला तर सरकार कोसळू शकतं. त्यामुळं ते ठाकरे गटाला अनुकल निर्णय देणार नाहीत. याविषयी पत्रकारांनी राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे. महाराष्ट्रातील सगळेच पक्ष त्यांनी फिरले आहेत. त्यामुळं पक्षांतराविषयी त्यांना चूक असं काही वाटत नाही. पक्षांतराला ला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे, अशी टीका केली. ते त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. करत नाही. त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असं राऊत म्हणाले.

 

Tags

follow us