Download App

Raj Thackeray : ‘मनसेच्या वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद’

  • Written By: Last Updated:

ठाणे : मनसेच्या (MNS) वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाण्याततील गडकरी रंगायतनमध्ये आज मनसेच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना राज ठाकरेंनी हा निशाणा साधला.

या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसेने केलेल्या कामकाजाचा पाढा वाचला. ते म्हणाले, नाशिकमध्ये मनसेने सत्ता असतांना अनेक कामे केली. अनेक प्रश्न मार्गी लावली. नाशिकमधल्या पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. मराठी कलावंताना त्यांच्या चित्रपटासाठी थिएटर मिळत नव्हते. तेव्हा प्रत्येकवेळी मनसेनं आंदोलनं केलं. मनसेनं दुकांनावरील पाट्या मराठीत केल्या. त्यासाठी आंदोलन करावं लागलं. मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी मुलखासाठी मनसेनं आघाडीवर आहे, असं ते म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, ब्लू प्रिंट सादर करणारा मनसे हा पहिला पक्ष आहे. तरीही पत्रकार आम्हालाच सवाल करतात. पाकिस्तानी कलाकारांना २४ तासात हुसकावून लावण्याचं काम मनसेनं केलं. जे सो कॉल्ड पक्ष स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेतात. ते पक्ष कुठं होतं? तेव्हा ते पक्ष का नाही रस्त्यावर उतरले? ते काय करत होते? चिंतन! उलट ते सांगतात, की, आम्ही हिंदुत्वाला मानतो. पण, तुमचं हिंदुत्व तरी काय असतं… नुसती जपमाळा…. प्रत्यक्ष कृती तर काही दिसत नाही. मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवण्यात आलं. तेव्हा विनोद करणारे कोण हिंदुत्ववादीच. यातही राजकारण झालं. मशिदींवरील भोंगे हटवा यासाठी आम्ही आंदोलन केलं. तेव्हा शेकडो मनसेच्या कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रभर 17 हजार केसेस झाल्या. बोललो ना वाट्याला जायचं नाही, शेवटी गेलं ना मुख्यमंत्रीपद, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरें यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, जनता सध्याच्या राजकीय तमाशा विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेंच आहे. जेव्हा कधी महानगरपालिकेच्या इलेक्शन लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार म्हणजे, असणार, असंही ते म्हणाले.

तुम्हाला पण ओहोटी येईल… भाजपवाले हे विसरू नका, राज ठाकरेंचा टोला

Tags

follow us