Download App

मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस

  • Written By: Last Updated:

Legislature notice to MLAs from Sharad Pawar group : सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह कुणाचं यावर सुप्रिम कोर्ट (Supreme Court)आणि निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. अनिल देशमुख, राजेश टोपेेंसह अन्य काही आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात मोठा संघर्ष सुरू आहे. शरद पवार गट आणि अजितदादा गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. अशातच शरद पवार गटाच्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं त्यांना अपात्र का ठरू नये, अशी याचिका विधिमंडळात दाखले केली.

अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेनंतर शरद पवार गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाटी विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. येत्या आठ दिवसांत या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी विधिमंडळाने मुदत दिली आहे. त्यामुळं विधीमंडळाच्या नोटिशीला शरद पवार गटाकडून लवकरच उत्तर दाखल केलं जाणार असल्याची माहिती आहे.

विधानसभेने आतापर्यंत शरद पवार गटाच्या 10 आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना विधिमंडळाने यापूर्वीच नोटीस बजावली आहे. तर आता आठ आमदारांना नोटीसा बजावल्या.

गद्दारीचा शिक्का जाणार नाही, सगळ्यांना साफ करतो अन् खरी शिवसेना दाखवतो; ठाकरेंची भाजप-शिंदे गटावर टीका 

मात्र, शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना विधानसभेने नोटीस बजावलेली नाही. तर नवाब मलिक यांनीही तटस्थ राहणं पसंत केल्यानं त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली नाही.

‘या’ आमदारांना नोटीस बजावली!
1) अनिल देशमुख

२) राजेश टोपे

3) सुनील भुसारा

4) प्राजक्ता तनपुरे

५) रोहित पवार

6) सुमन पाटील

7) बाळासाहेब पाटील

8) संदीप क्षीरसागर

जुलैमध्ये अजित पवारांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी करून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी थेट पक्षावरच दावा केला. तर आता विधीमंडळाने शरद पवार गटाला नोटीस पाठवली असून त्यावर शरद पवार गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us