मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच राज्यात भाजप व शिवसेना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखत आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा मोदींच्या पारड्यात टाका असे आवाहन केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, की शाह यांनी मोदींच्या नव्हे तर NDA ला मतदान करावे असे आवाहन केले असल्याचे स्पष्ट केले. तसेच कन्फ्युज करू नका, आमचा फॉर्म्युला ठरला असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
राज्यात शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यातच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष चिन्ह व पक्षाचे नाव हे एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यानंतर शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील तणाव वाढला आहे. तसेच यावरून नेतेमंडळी देखील एकमकेवर आरोप – प्रत्यारोप करत आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांच्यावर शब्दिक हल्लाबोल केला.
राज्यातील येत्या काळात येणाऱ्या निवडणुकीत मोदींना म्हणजेच भाजपाला मतदान करावे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले होते. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, कोणतेही कन्फ्युजन होऊ नये यासाठी शिवसेनेचे खासदार आमच्या मंचावर होते.
बजेटची चिंताच सोडा, अवघ्या सहा लाखात खरेदी करा ‘ही’ भन्नाट कार
तसेच अमित शाह यांनी मोदींना मतदान करा असे म्हंटले नाही तर NDA ला मतदान करावे असे आवाहन केले आहे. तसेच राज्यात सध्या शिवसेना (शिंदे गट) व भाजपचे सरकार आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आमचा फॉर्म्युला ठरला आहे, योग्यवेळी आमची जाहीर करू यामुळे कोणतेही कन्फ्युजन करू नका असे आवाहन देखील यावेळी फडणवीसांनी केले आहे.