Tore Banner Of Anuradha Nagawade In Shrigonda : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच श्रीगोंदा तालुक्यातून मोठी बातमी समोर आलीय. श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई राजेंद्र नागवडे (Anuradha Nagawade Banner) आहेत. नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर श्रीगोंदा तालुक्यात लावण्यात आले होते. तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी गावागावात लावलेले नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर फाडल्याचं समोर आलंय. त्यामुळे तालुक्यात मोठी चिड निर्माण होवून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तालुक्यातील पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला आहे.
श्रीगोंदा (Shrigonda) विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलीय. मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागल्याचं दिसत आहे. सुडबुध्दीने विरोधी कार्यकर्ते आपल्या बुध्दीचे विकृत दर्शन देत गावागावात नागवडे यांच्या फोटोंसह मशाल चिन्हांचे बॅनर फाडून त्याला काळे फासत आहेत.
माझ्या विरोधात एक भाजपचे अधिकृत तर एक अनधिकृत उमेदवार, अनुराधा नागवडेंचा विरोधकांना टोला
सत्तेत असताना आपले कर्तृत्व सिध्द करता आलं नाही. निवडणूक प्रचारात सामान्य जनतेचा नकारात्मक विरोध दिसू लागला. त्यानंतर आता खालच्या पातळीवर जावू फ्लेक्स बोर्ड फाडून मतदारसंघात दहशत निर्माण केली जातेय. याला सर्वसामान्य जनता भीक घालणार नाही, अश्या भावना नागवडे यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहेत.राजकारणात विरोध करण्याच्या सर्व मर्यादा विरोधकांनी ओलांडल्या आहेत.द्वेष जिथे निर्माण होतो तिथे पराभव दिसू लागल्याची स्पष्ट चित्र दिसू लागतात, अशी टीका देखील केली जातेय.
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडेंना तिकीट
बॅनरवरील अनुराधाताईचे फोटो तुम्ही काढाल, परंतु आज लोकांच्या मनात त्यांचे कर्तुत्व निर्माण होत असलेले स्थान काढू शकत नाही. 2012 साली पंचायत समिती निवडणुकीत सुध्दा अशाच पध्दतीने विरोधकांनी प्रचाराचे बॅनर फाडले होते. तेव्हा अनुराधा नागवडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत विरोधकांना समोर पराभव दिसत असल्यामुळे सूडबुद्धीने राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर येत असेल. तर, एका महिलेच्या कामाचा एवढा धसका तुम्ही घेतला. हाच माझा विजय आहे, अशा शब्दांत अनुराधा नागवडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय.