Download App

Pankaja Munde : पिंपरी-चिंचवडचा ‘शास्तिकर’ लक्ष्मण जगतापांनी माफ केला

  • Written By: Last Updated:

पिंपरी : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे १९८५ साली निवडणूक हारले होते. परंतु, तरी त्यांनी लोकांची सेवा करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हारलो तरी सेवा अविरत सुरु ठेवली पाहिजे. ही शिकवण मी त्यांच्याकडून घेतली आहे. तसेच स्व. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीही पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी काही स्वप्न पाहिली. त्यात येथील जनतेची जाचक ‘शास्तिकर’ माफ करण्याची मागणी त्यांनी पूर्ण केली. काही स्वप्न त्यांची अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, पूर्वी मला रणरागिणी म्हणून संबोधले जायचे. मात्र, स्व. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर मला सर्वजण वाघीण म्हणायला लागले. कारण काय तर जबाबदारी येऊन पडली आणि ती मोठ्या धीराने निभावली. त्यामुळेचे लोकं वाघीण बोलू लागले. मला राजकारणात येऊन १७ वर्षे होऊन गेली. पण कधी कुणाचा हेवा केला नाही. सुपरस्टार गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी माझा जन्म झाला आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर मला कुठल्याच गोष्टीचा मोह राहिला नाही, तर समोर बसलेल्या दिनदुबळ्या लोकांचे प्रश्न सोडवणे हाच माझी प्राथमिकता राहिली आहे.

Tags

follow us