Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी पुन्हा एकदा पक्षातील आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत एक इशारा दिला. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडे काय करणार? हे गौण आहे. त्याकडे कुणाचं लक्ष आहे? तसेच व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेल. असं म्हणत त्यांनी पक्षाला जणू सूचक इशाराच दिला आहे.
Ahmednagar News : शिरसगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या की, मला लोकसभेमध्ये जायला आवडेल की विधानसभेमध्ये त्यावर मी आत्ता प्रकाश टाकू शकणार नाही. ते येणाऱ्या काळामध्ये ठरेल. पक्ष जेव्हा यावर भूमिका घेईल. त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन. तसेच मी कुठे असावं? हे कुणाला आवडण्यापेक्षा मी कुठे असल्याने पक्षाला फायदा होईल? हे महत्त्वाचा आहे. तसेच व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात. ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेल. तर प्रीतम मुंडे यांच्या खासदारकी बद्दल पक्षाचे अध्यक्षांच्या सहीने जी यादी जाहीर होईल त्यानंतरच त्यावर प्रकाश पडेल.
‘रक्ताचे पाट सोडा दगडफेकही नाही’; ‘काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील’ म्हणणाऱ्या गांधींना टोला
कारण राजकारणात आत्मा किंवा मन असं काही नसतं जे लोकहिताचा आहे. जे लोकांना जास्त आवश्यक आहे. ते करण्यातून जास्तीत जास्त योग्य निर्णय घेण्याकडे माझा कल राहिलेला आहे. त्यामुळे माझी भूमिका काय असेल? हे लोकसभेची पुढची यादी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. तसेच सध्या देश निवडणुकांकडे चालला आहे त्यामुळे पंकजा मुंडे काय करणार? हे गौण आहे. त्याकडे कुणाचं लक्ष आहे? देशाला जागतिक शक्ती बनवण्यासाठी पावलं उचलली जाणे महत्त्वाचं आहे.
सारा आणि करिश्मा अडकणार संशयाच्या भोवऱ्यात; ‘मर्डर मुबारक’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, अमित शहांचा दौरा आजचा भाजपचा दौरा आहे. देशामध्ये प्रत्येक मंत्र्यांना एक-एक क्लस्टर दिला आहे. त्या अनुषंगाने अमित शहा आज महाराष्ट्रात आले आहेत. हा दौरा पक्षाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या दौरा आहे. त्यामुळे हा सकारात्मकच दौरा आहे. या लोकसभा निवडणुकांमध्ये माझा आढावा घेण्याचे रोल नाही. त्यासाठी राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी प्रमुख नेते त्यांना रिपोर्टिंग करतील. मात्र ते देशाचे गृहमंत्री असल्याने असा कुठलाच मुद्दा नसतो जो त्यांना माहीत नसतो. कारण मी त्यांच्यासोबत 2014 पासून काम करते. असं यावेळी पंकजा म्हणाल्या.