पार्थ पवारांनी रणनीती आखली? रणनीतीकार प्रशांत किशोरसोबत 4 तास मॅरेथॉन बैठक

Parth Pawar Prashant Kishor Meeting; पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये तब्बल 4 तास बैठक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Parth Pawar Prashant Kishor Meeting

Parth Pawar Prashant Kishor Meeting

Parth Pawar Prashant Kishor Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने आगामी राजकीय वाटचालीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत पक्षाने काम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये तब्बल 4 तास बैठक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशांत किशोर या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का, आणि आगामी काळात पक्षाच्या रणनीतीत कोणते बदल होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पाणी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर कलाविष्कारांतून जनजागृती; पु.ल. कला महोत्सवाची रंगणार सांस्कृतिक पर्वणी!

आगामी काळात महायुतीतील भाजप आणि शिवसेनेसोबत समन्वय कसा साधायचा, तसेच राष्ट्रवादीची भूमिका कोणत्या पद्धतीने मांडायची, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. पक्षाची सोशल मीडिया रणनीती, माध्यमांशी संवाद आणि राजकीय संदेश पोहोचवण्याच्या पद्धतीबाबतही नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षाच्या रणनीतीची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्या टीमकडे?

सूत्रांच्या माहितीनुसार, मागील चार महिन्यांपासून प्राथमिक स्तरावर सुरू असलेले काम आता प्रशांत किशोर यांच्या टीमकडून अधिक व्यापक स्वरूपात हाताळले जाणार आहे. पक्षाच्या राजकीय आणि प्रचारविषयक रणनीतीसाठी टीमची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला सुरू; सिया-चेतनच्या जामीन अर्जांवर 17 नोव्हेंबरला सुनावणी

या टीमसोबत समन्वय साधण्याची आणि आर्थिक व्यवहारांची जबाबदारी आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही समजते. याशिवाय, प्रशांत किशोर यांच्या टीमला पक्षाकडून मोठी रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती दिल्याचे समजते. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत पक्षाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महायुतीतील समन्वयावर भर; पक्षांतर्गत बदलांचीही चर्चा

भाजप आणि शिवसेनेसोबत महायुतीत काम करताना राष्ट्रवादीने कोणती भूमिका घ्यावी, यावर बैठकीत विशेष चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी राजकीय घडामोडी, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या रणनीतीचा वापर यावरही विचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात अधूनमधून सुरू असते. मात्र, अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही बाजूंनी अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

बाळासाहेबांनी संजय राऊतांना मुलाखतीतच दिल्या शिव्या! राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा

विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात पक्षाच्या कामकाजात कोणते बदल होणार, महायुतीतील समन्वय कसा साधला जाणार आणि राष्ट्रवादीची राजकीय दिशा काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version