ब्रेकिंग! पटोलेंना डावलले आणि फडणवीसांना भेटले, आमदार थोपटेंच्या मनात काय?

पुणे : कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमाला संग्राम थोपटे गैरहजर राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. बारामतीमध्ये ज्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत, त्याच कार्यक्रमाला दांडी मारुन थोपटे संग्राम थोपटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात […]

Untitled Design (18)

Untitled Design (18)

पुणे : कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमाला संग्राम थोपटे गैरहजर राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय.

बारामतीमध्ये ज्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत, त्याच कार्यक्रमाला दांडी मारुन थोपटे संग्राम थोपटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

आमदार संग्राम थोपटे यांची भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे करून मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे.

दरम्यान, कमी वयात थोपटे यांनी राजकारणात पाऊल ठेऊन राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आहे. कॉंग्रेसचे एकनिष्ठ म्हणून संग्राम थोपटे यांची राजकारणात ओळख आहे.

थोपटे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असून आता थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार का? कॉंग्रेसमध्ये असताना त्यांची घुसमट होतेयं का? सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

Exit mobile version