Soniya Duhan : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ते राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पवारांच्या मागे बसलेली युवती कोण हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर वारंवार विचारण्यात येतोय. पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सपासून मागे बसलेली युवती नेमकी कोण चर्चांना उत आलायं. आता ही युवती कोण आणि शरद पवारांच्या मागे कशीकाय? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत. सोनिया दुहान असं या युवतीचं नाव आहे.
दंगलप्रकरणी नऊ आरोपींना अटक ; गावात दुसऱ्या दिवशीही बंदोबस्त
सोनिया दुहान असं या युवतीचं नाव. सोनिया मूळची हरियाणाची. कुरुक्षेत्र विद्यापीठातून बीएसस्सीच्या शिक्षणानंतर पुण्यात दाखल झाली. वैमानिक बनण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या सोनिया दुहानने 21 व्या वर्षी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर सोनिया प्रकाशझोतात आल्या. सोनिया दुहान युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सोबतच त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याही आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठात राष्ट्रवादीचं नेतृत्व केलंय.
‘The Kerala Story’वरून टीका करणाऱ्या केदार शिंदेंना, भाजपाच्या ‘या’ नेत्यानी फटकारलं
एवढंच नाहीतर तिने राष्ट्रवादी पक्षासाठी अनेकदा महत्वाच्या भूमिका बजावल्याची माहिती समोर आलीय. 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीदरम्यान, भाजपच्या गोठ्यात गेलेल्या आमदारांना पुन्हा राष्ट्रवादीत आणणारी हीच सोनिया दुहान होती. यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता.
तुमची अवस्था कुत्रापेक्षा वाईट, अब्दुल सत्तारांचे राऊतांना प्रत्युत्तर
त्यानंतर मागील वर्षी एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आमदार गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये होते. त्यावेळी बोगस कागदोपत्रांच्या आधारे सोनिया आणि श्रेया कोठीवाल यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला होता.
दरम्यान, शरद पवारांनी आत्तापर्यंत दिलेल्या जबाबदारी चोखपणे सोनिया यांनी पार पडलीय. त्यामुळेच त्या शरद पवारांच्या निकटवर्तीय आणि विश्वासातल्या सहकारी झाल्याचं सांगितलं जातंय.