कॉंग्रेसला धक्का, फुलंब्री बाजार समिती भाजप-शिंदे गटाने 14 जागा जिंकत ताब्यात घेतली

Phulumbri Bazar Samiti BJP-Shinde group captured 14 seats : राज्याचं लक्ष लागून असलेल्या आणि माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (MLA Haribhau Bagde) यांच्या मतदार संघातल्या बाजार समितीत अखेर सत्ता परिवर्तन झाले. माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता असलेली फुलंब्री बाजार समिती (Phulumbri Market Committee) बागडे […]

Untitled Design   2023 04 30T204140.730

Untitled Design 2023 04 30T204140.730

Phulumbri Bazar Samiti BJP-Shinde group captured 14 seats : राज्याचं लक्ष लागून असलेल्या आणि माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (MLA Haribhau Bagde) यांच्या मतदार संघातल्या बाजार समितीत अखेर सत्ता परिवर्तन झाले. माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता असलेली फुलंब्री बाजार समिती (Phulumbri Market Committee) बागडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गटाने 14 जागा जिंकत ताब्यात घेतली.

फुलंब्री बाजार समितीच्या निवडणुकीत मागील गेल्या 15 वर्षापासून माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने वर्चस्व सिध्द केले होते.त्यामुळं यंदा या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी चांगलीच ताकत लावली होती. तर कोणत्याही स्थितीत बाजार समितीत कॉंग्रेसचीच सत्ता असायला हवी, असा चंग काळे यांनी बांधला होता. दरम्यान, आता फुलंब्री बाजार समितीच्या 18 संचालकांसाठी आज मतदान झाले आणि सायंकाळीच मतमोजणी होऊन निकाल हाती आला. त्यानुसार, भाजप-शिंदे 14 जागा जिंकत बाजी मारला. तर महाविकास आघाडीला केवळ एक जागा मिळाली. शिंदे गटाचे ठोंबरे यांनी भाजप सोबत न जाता स्वतंत्र उमेदवार दिल होते. त्यांच्या दोन जागा निवडणून आल्या. तर हमाल व तोलारी मतदारसंघातून 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला.

Apmc Election Newasa : एक हाती सत्ता मिळवत गडाखांनी गड राखला, भाजप भूईसपाट

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आ. बागडे यांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर मतदारसंघातील बाजार समितीत देखील आपला करिष्मा दाखवला. त्यामुळं खऱ्या अर्थाने बागडे यांनी करून दाखवलं अशी चर्चा आहे. कॉंग्रेसची पंधरा वर्षाची सत्ता गेल्यानंतर भाजप-शिंदे गटाने एकच जल्लोष केला. तर हा धनशक्तीमुळे झालेला विजय असल्याची टीका विरोधकांनी केला.

दरम्यान, ठाकरे गटात फुट पडल्यानंतरही भाजपने फुलंब्रीत सत्ता परिवर्तन घडवले. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीनंतर फुलंब्रीत भाजपने मविआला धुळ चारल्यानं बागडे यांचे वजन वाढले आहे.

Exit mobile version