Police arrest three in Satara drug case; Crime Branch’s big revelation Shinde’s brother : सातारा जिल्ह्यातील सावरी गावामध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकली होती. त्यामध्ये तब्बल 45 किलोंचा 145 कोटी किंमतीचा ड्रग्जचा साठा ताब्यात घेण्यात आला होता. या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाचे लागेबांधे असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून शिंदेंच्या भावाबाबत देखील मोठा खुलासा केला आहे.
तिघांना अटक, शिंदेंच्या बंधुंबाबत मोठा खुलासा
सातारा ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली. ज्यामध्ये ओंकाप डिगे या तरूणाला ताब्यात घेतलं होतं. त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे समोर आलेल्या इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यामध्ये अब्बास सयद उर्फ सद्दाम, वय 29 वर्ष, राजीकुल रहमान वय 30 वर्ष, हाजीबुल इस्लाम वय 25 वर्ष या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील एक आरोपी पालघर तर एक आसाममधील मोरी गावातील असल्याचं समजत आहे.
कुणाला अनुकूल लाभ तर कुणाला प्रतिकूल; जाणून घ्या मेषपासून मीनपर्यंत आजचा दिवस कसा राहणार?
तसेच यावेळी पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोप झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधु प्रकाश शिंदेंबाबत महत्त्वाचा खुलासा केला की, प्रकाश शिंदेंच्या जमिनीवर सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना जेवण पुरवले जात नव्हते. तसेच दरेगाव जे एकनाथ शिंदेंचं गाव आहे. तेथील सरपंच रणजित शिंदे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंद आढळून आलेला नाही.
