Download App

कामाला लागा, 2024 मध्ये राष्ट्रवादी नंबर एक करायचाय; तटकरेंचा संकल्प अन् मित्रपक्षांना इशारा

Sunil Tatkare : पुढील 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होतील. राज्यात निवडणुका असल्याने त्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एक बनविण्यासाठी वाटचाल करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

‘मुंबईतच का, ठाणे आणि पुण्यातही चौकशी करा’; ईडीच्या कारवाईवर दानवेंचा संताप

तटकरे पुढे म्हणाले, शरद पवार यांनी 25 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पवार साहेबांच्या नेतृत्वात राजकारणात अनेक चढ उतार पाहिले. तो काळ सुद्धा राज्यात आणि देशातील अस्थिरतेचा होता. त्या काळात शरद पवार यांनी अनेक निर्णय घेतले.

सध्या राजकारणाची पातळी खालावली आहे. धर्म आणि समाजाच्या नावावर गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता 2024 मध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविण्याचा संकल्प करू या, असे तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्र पक्षांना इशारा देताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कळत न कळत काही बोलले गेले असेल त्यांना माझी विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कुणाला काहीही करता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या फळीनेही दिशा देण्याचे काम चांगल्या पद्धतीने केल्याचे तटकरे म्हणाले.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Tags

follow us