Download App

महाविकास आघाडीचे निमंत्रणही येऊन प्रकाश आंबेडकर प्रचंड चिडले! थेट पत्र काढत नवी अट घातली

Prakash Ambedkar on Nana Patole : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले. त्यावर वंचितकडून अर्थात अॅड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निमंत्रणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे का? अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘महायुतीकडून ओबीसी मंत्र्यांची अवहेलना’, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान नसल्यानं वटेट्टीवारांचे टीकास्त्र

वंचितने थेट पत्र काढून नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार नसताना वंचितला निमंत्रण कसं काय दिलं? असा थेट सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज 25 जानेवारीला बैठक होणार होती. त्या बैठकीसाठीचं पत्र वंचितला देण्यात आलं होतं. त्या पत्रावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सह्या होत्या. त्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेत घणाघाती टीका केली आहे.

‘वंचित’ने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार 23 जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.

माझी झोपेतच सही घेतलीयं, दुरुपयोग झाल्यास माझ्याशी गाठ; मनोज जरांगेंचा कडक शब्दांत इशारा

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की, काँग्रेस हाय कमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत.

शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत.

AICC किंवा काँग्रेस हाय कमांडने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का? असा सवालही या पत्राद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे.

औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांचे अध्यक्ष, म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे, यांची सही असायला हवी.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अर्थात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे किंवा रमेश चेन्नीथाला, राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणीही वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ असे जाहीरपणे वंचित आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

follow us