Download App

Prakash Ambedkar : आपल्यावरच्या केसेस क्लिअर करण्यासाठी अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : Early morning swearing-in only to clear scam cases 2019 च्या विधानसभा निवडणुकी (2019 Assembly Elections) दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळं काही काळ अजित पवार हे नॉटरिचेबलही होते. तेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणीस एकत्र आले होते. 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटे-पहाटे मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही. मात्र, या पहाटेच्या शपथविधीची चर्चा देशभर झाली होती. अजूनही या शपथविधीचा उल्लेख होता. काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शपथविधीबाबत शरद पवारांच्या कल्पना होती, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही पहाटेच्या शपथविधी विषयी भाष्य केलं. केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला, असा आरोप त्यांनी केला.

बदलापूरमधील एका कार्यक्रमात बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह, भाजप, संघावर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी सागंतिलं की, अजित पवारांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करून घेतला. त्यांनी आपल्या केसेस विथड्रा केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर ते सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा राष्ट्रवादीत आले. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना उल्लू बनवलं…. पण, ज्या दिवशी हे दोघे तिहार जेलचा रस्ता दाखवतील, त्या दिवशी यांना नांग्या टाकाव्या लागतील, असा टोला आंबेडकरांनी लगावला.

“इधर उधर की बात न करो, ये बताओ अदानी से आपका रिश्ता है क्या?”, ‘मन की बात’ वरून नाना पटोलेंचा मोदींना टोला

दरम्यान, अजित पवार यांच्या भाजपच्या कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे.सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकार कोसळू शकतं. त्यामुळं भाजपकडून आता हालचाली सुरू झाल्यात. त्याचाच भाग म्हणून अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मात्र, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा आधी स्वत:ला शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणवत असे. आणि आता राष्ट्रवादी भाजपसोबत जात असेल तर त्यांनी इतकी वर्ष जनतेला फसवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरड्यासारखा रंग बदलत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. पूर्वी शाहू, फुले, आंबेडकरवाद्यांचा कलर होता, आता भाजप शिवसेनेचा कलर होतोय की काय असं वाटालया लागल्याचं आंबेडकर म्हणाले.

Tags

follow us