Download App

प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : मुस्लिम लोकांनी साथ दिली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावर भाजप आमदार राम शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर ये म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यांची फसगत झालेली आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.

भाजप आमदार राम शिंदे हे नगरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने एमआयएम बरोबर युती केली होती, त्यांनी त्यांच्याबरोबर फारकत घेतली.

प्रकाश आंबेडकरांनी आता नव्याने प्रस्ताव उद्धव ठाकरे बरोबर दिलाय. दरम्यान वंचितने चिंचवडमध्ये उमेदवार दिला त्यांनी बोर्डवर बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावले पण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलं. त्यामुळे त्यांची फसगत झालेली आहे अशा शब्दात राम शिंदे यांनी आंबेडकरांवर शाब्दिक निशाणा साधला आहे.

सौफी चौधरीचा बोल्डनेस तुम्हाला घायाळ करेल

दरम्यान नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. यावर देखील शिंदे यांनी भाष्य केले. शिंदे म्हणाले, मोदींच्या नेतृत्वामुळे भयभीत झालेले, अडचणीत आलेले सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 ला देखील तसा प्रयत्न झाला. आता भविष्यात देखील तशा पद्धतीचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पण याचा भाजपला काहीही फरक पडणार नाही. हा त्यांचा केवळ मीडियाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे असं राम शिंदे म्हणाले.

आधी भाजपवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ फोटोवर रुपाली ठोंबरेंचे स्पष्टीकरण

Tags

follow us