‘सनातन धर्म मानणाारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

Prakash Ambedkar : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीला 28 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीला पर्यायाने प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. आम्हाला फक्त समाजातचं अस्पृ्श्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य […]

ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे; आंबेडकरांची भूमिका स्पष्ट

prakash ambedkar speak

Prakash Ambedkar : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीला 28 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीला पर्यायाने प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. आम्हाला फक्त समाजातचं अस्पृ्श्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणून वागवलं जातं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापन केल्याचं विरोधक सांगत आहेत. मात्र, या आघाडीत वंचित बहुजन आघाडी नाही. सातत्याने भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या राज्यातील महत्वाच्या नेत्यालाच बैठकीचं निमंत्रण नव्हतं. इंडिया आघाडीच्या बैठकीचे संयोजक उद्धव ठाकरे होते. तरीही आंबेडकरांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं नव्हतं.

Jawan: ‘या’ लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने पायऱ्यांवर बसून बघितला किंग खानचा सिनेमा; यावर नेटकरी म्हणाले… 

त्यानंतर काल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी ही काय सत्यनारायणाची पूजा सुरू आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकारंना केला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकारंनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, आम्हाला केवळ समाजातच नव्हे, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जाते. भाजप-आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचार असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राजकारणात अस्पृश्यता पाळायला सुरुवात केली आहे, अशी घणाघाती टीका आंबेडकारंनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी पुढं लिहिलं की, #IndiaAliance मध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होता? असा थेट सवाल त्यांनी केला. शिवाय, लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती तर त्यांना तुम्ही निमंत्रणे दिले असते का? याबद्दल मला शंकाच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Exit mobile version