Prakash Ambedkar Reaction On About 2000 rupee note : रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) नुकतेच 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर कडाडून टीका होत आहे. यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही 2000 रुपयांच्या नोटाबंदीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नोटबंदी म्हणजे लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची नांदी आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या पार्श्वभूमीवर २ हजाराच्या नोट बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीबाबत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
आंबेडकर म्हणाले, या 2 हजारांच्या नोट आगामी निवडणुकांमध्ये वापरल्यामध्ये जाणार का? आणि त्या आपल्या विरोधात वापरल्या जाणार का?, याची भीती आणि शक्यता भाजपला वाटत असल्याने सरकारने या नोटा रद्द केल्या. ही नोटबंदी करून नोटा फक्त पाच वर्ष चालतात, याचा अजब शोध भाजपने लावल्याची टीका त्यांनी केली.
आता दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवावी; नोटबंदीच्या निर्णयावरून आव्हाडांची खोचक टीका
यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने मध्यरात्री 12 नंतर अचानक 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करून नवीन 500 रुपयांची नोट चलनात आणली होती. त्यासोबतच दोन हजारांची नोटही व्यवहारात आणली होती. दरम्यान, आता शुक्रवारी पुन्हा एकदा आरबीआय आणि केंद्र सरकारने दोन हजाराची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.