एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार! प्रताप सरनाईकांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Pratap Sarnaik says Eknath Shinde will become CM again: मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबत वक्तव्य केले.

Pratap Sarnaik says Eknath Shinde will become CM again

Pratap Sarnaik says Eknath Shinde will become CM again

Pratap Sarnaik says Eknath Shinde will become CM again: एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा शिवसेनेतील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी याआधीच जनतेचीही हीच इच्छा असल्याचे म्हटले होते. आता मंत्री प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’ उदय सामंत यांचा जयकुमार गोरेंना टोला!

प्रताप सरनाईक म्हणाले की, सध्या आमच्या पक्षाचे संख्याबळ कमी असल्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, आगामी काळात आमदारांची संख्या वाढवून त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल. याआधी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वारंवार व्यक्त होणाऱ्या इच्छेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

“भारतातही सत्ताबदलाचे प्रयत्न सुरू, पण त्याने काही होणार नाही”; विजयादशमी सोहळ्यात मोहन भागवतांचे मोठे विधान

दरम्यान,आगामी काळात पक्षाचे संख्याबळ वाढवण्याबाबत शिवसेना कोणती रणनीती आखते आणि या विधानांवर महायुतीतील इतर नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version