Download App

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांवर दबाव; जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि राष्ट्रवादीचे (NCP)आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांच्यात कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खटके उडत आहेत. त्यातच आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक फेसबुक पोस्ट (Facebook Post)लिहित मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांवर दबाव (Pressure on the police)टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. एकप्रकारे मुख्यमंत्र्यांकडून साक्षीदारांवर मानसिक दबाव टाकला जात असल्याचाही आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, विधानसभेमध्ये विरोधी पक्षातील कोणीही सदस्य उपस्थित नसतांना आणि मी स्वत: सभागृहामध्ये उपस्थित नसतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमुसे प्रकरणात मी कसा दोषी आहे? याचा पाढा वाचून दाखवला. एकतर न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं म्हणजे एकतर पोलिसांवर दबाव आणण्यासारखं आहे, जे साक्षीदार आहेत त्यांच्यावर देखील मानसिक दबाव आणण्यासारखं आहे, अशी टीका यावेळी आव्हाडांनी केली आहे.

WPL Final : मुंबई इंडियन्सच्या महिला संघाने इतिहास रचला

सत्तेचा गैरवापर हे सरकार करीतच आहे. अनेक शिवसैनिकांची घरं-दारं उध्वस्त केली, तेव्हा कायदा, न्यायव्यवस्था काहीच दिसलं नाही. केवळ मालकाची पत्नी उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर दिसली म्हणून हॉटेल तोडणारे आज आम्हाला कायदा व सुव्यवस्था शिकवायला सभागृहात बोलत होते, अशी परखड शब्दात टीका केली आहे.

आतापर्यंत 6 महिन्यांत किती जणांचे संसार उद्ध्वस्त केले याचा हिशोब करा. माझा एक साधा सरळ आपल्याला प्रश्न आहे. जो फोटो माझा करमुसेने लावला होता, तसा फोटो तुमचा मी लावतो. बघुयात आपल्याला किती सहन होतं ते. करमुसेची पूर्ण बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये आपणच लढवलीत हे संपूर्ण जगाला माहीत आहे.

त्याचवेळी आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आपणच मला विधानसभेत दम दिला होता की, तुझी एक चौकशी आमच्याकडे आहे लक्षात ठेवं. दमदाटीने राजकारण करता येत नाही, दमदाटीने सरकार चालवता येत नाही. जे आहे ते न्याय आहे. पण, एखाद्या मुख्यमंत्र्यांना न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना सभागृहात बोलणे हे कायद्याला धरुन नाही. हे आपल्या लक्षात आलं असतं तर बर झालं असतं, असंही त्यांनी म्हटले आहे.

आपल्याला कायदा मान्यच नाही हे आपल्या वागण्यावरुन गेल्या 6 महिन्यांत दिसून आलं आहे. तोंडात येईल ते बोलायचं. सभागृहाचा सन्मान किंवा विरोधी पक्षातील आमदारांचा सन्मान हा आपल्या लेखीच नाही. अर्थात आम्हीही लढायला तयार आहोत. फक्त एवढच लक्षात ठेवा. जे करमुसेने माझ्या बाबतीत केलं ते कोणीतरी आपल्या बाबतीत करेल तेव्हा बघुयात आपली किती सहनशीलता आहे ते, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us