Download App

Pulwama attack : सत्यपाल मलिकांच्या आरोपावरुन काँग्रेस आक्रमक, ‘मोदींनी उत्तर द्यावं’

Congress aggressive on Pulwama attack allegations : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा हल्ल्यासंदर्भात (Pulwama attack) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपावर विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुलवामामध्ये 40 जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, मलिक यांच्या आरोपात अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना आणि 300 कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे, असे नाना पटोले म्हणाले.

कर्नाटकमध्ये घड्याळाची ‘टिक-टिक’ चालणार; राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून दिलासा

पुलवामा घटनेत सरकारची अक्षम्य चूक झाली या मलिक यांच्या आरोपावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले? जवानांना दुसरीकडे पाठवण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का नाकारण्यात आली? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेत वापरलेले गेलेले 300 किलो आरडीएक्स कुठून आले? याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मलिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न मोदी सरकारकडे बोट करत आहेत. हे आरोप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. पुलवामा घटना व 40 जवानांचे बलिदान भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले का, या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावी लागतील, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले पुढं म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी 300 कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती हा आरोपही अत्यंत गंभीर आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, अशा गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या राज्यात 300 कोटींची ऑफर राज्यपालांना दिली जाते हे स्वतः मलिक सांगत आहेत त्यावर भाजपाकडून एक शब्दही का काढला जात नाही.

राहुल गांधींना विरोध करणाऱ्यांचा पाय शिल्लक ठेवणार नाही; अंबादास दानवेंचा बावनकुळेंना इशारा

सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती संशयाचे ढग गडद झाले आहेत. सत्यपाल मलिक हे भाजपाचेच नेते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर खुलासा करुन सत्य काय आहे ते जाहीर करावे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे पटोले म्हणाले.

Tags

follow us