Radhakkrushn Vikhe Patil On Abdul Sttar : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं होतं. सत्तार म्हणाले होते की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. असं अब्दुल सत्तार म्हणाले होते तर एकनाथ शिंदेंनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या काळात महसूल विभागात महत्त्वाचे निर्णय होत आहेत. तसेच कुणाला नाही वाटत आपला मित्र मुख्यमंत्री व्हावा. मात्र त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका असं देखील यावेळी सत्तार म्हणाले आहेत.
यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता विखे म्हणाले, ‘अब्दुल सत्तार हे माझे जवळचे मित्र आहेत. ते भावनिक माणूस आहेत. भावनेच्या भरात ते काही बोलले असतील. असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. आमचे नेते देवेंद्र पडणवीसच आहेत. असं ते म्हणाले आहेत.
ज्यावेळी सत्तारांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या सोबतच होते. ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी गारपिटीच्या बाबतीत कदाचित बघितलं असेल तर वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अवकाळी पाऊस झाला आहे. ते पंचनामे होणार आहे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेला शेतकरी आहे. तो वंचित राहणार नाही त्यांचे पंचनामे होणार आणि आताही काही नवीन पहिलेही पंचनामे झाले पंचनामे केली जाईल वस्तुनिष्ठ पंचनामे रब्बी असू द्या खरी असू द्या यामध्ये आता आपण बघितलं तर अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे याची निश्चित पंचनामे केले जातील झालेल्या नुकसानाची भरपाई जे काही निकष नियम आहे त्याप्रमाणे दिले जाईल. असं सांगितलं
Abdul Sttar : हनुमानासारखा भक्त असतो तर….; विखेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सत्तारांचं मोठ विधान
सत्तारांच्या या विधानाने राज्यात मुख्यमंत्री बदलणार का या चर्चांना बळ मिळालं आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार का याकडे देखील सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे.
यानंतर काल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यानंतर आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या सुट्टीवर जाणार असल्याचे कळते आहे. यावरुन आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.