Download App

मराठा समाजासाठी योगदान काय ते एकदा जाहीर करा? विखेंचे थेट शरद पवारांना ‘चॅलेंज’

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चिघळला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. त्यात सत्ताधारी व विरोधक एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता मराठा आरक्षणावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (
Radhakrishna Vikhe) पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या कालखंडात मराठा समाजासाठी त्यांचे काय योगदान आहे, त्यांनी जाहीर करावे, असे थेट चॅलेंजच राधाकृष्ण विखे यांनी दिले आहे.

कझाकस्तानमध्ये पोलाद खाणीला आग; 32 जणांचा मृत्यू, बेपत्ता लोकांचा शोध सुरु

विखे म्हणाले, शरद पवार हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात १५ वर्षे मंत्री होते. त्याच्या कालखंडात मराठा समाजासाठी त्यांचे काय योगदान आहे हे जाहीर करावे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी कधी प्रयत्न केलेत का ? गेल्या दहा वर्षांच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. त्यांनी जो मागे निर्णय घेतला त्याचे परिणाम आज मराठा समाज भोगत आहेत. त्यांची मराठा समाजाबाबत, आरक्षणाबाबत केव्हा तरी भूमिका स्पष्ट दिसली पाहिजे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या; आळंदीमध्ये नदीत उडी मारुन सरपंचाने संपवलं आयुष्य

काँग्रेसने ही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते सांगतात, ओबीसीमधील आरक्षण देणार नाही. तर काही काँग्रेसचे नेते सकल समाजाच्या आरक्षणा पाठिंबा देत आहे. ही काँग्रेसचे दुट्टपी धोरण आहे. तेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आहे. फक्त हवा द्यायचे काम सुरू असल्याचा आरोपी विखे यांनी केला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे. काही कायदेशीर अडचणी येत आहेत. परंतु आरक्षण दिले पाहिजे, यामध्ये कोणाच्या मनात संदिग्धता नाही. लोकांच्या भावना आहेत. तो त्यांचा अधिकार आहे.
यासंदर्भात सोमवारी आरक्षणासंबंधित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे.

सरकारला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र

फक्त सरकारला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र विरोधीपक्षाकडून रचले जात आहे. जरांगे यांनी त्यांच्या या प्रयत्नाला बळी पडू नये. जरांगे यांची भूमिका प्रमाणिक आहे. आम्ही त्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही विखे म्हणाले.

विरोधी पक्षांसाठी भूमिका घ्या

नेत्यांच्या गावबंदीबाबत मंत्र्याविषयी भूमिका घेतली जात आहे. तीच विरोधी पक्षासाठी घेतली जाणार का हा प्रश्न आहे. ज्यांनी आरक्षण घालवले ते आज उजळ माथ्याने फिरत आहे. हे वास्तव आहे, असे विखे म्हणाले. रोहित पवारांच्या यात्रेच्या स्थगितीवर विखे म्हणाले, रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहे. यात्रा सुरू ठेवली काय आणि बंद ठेवली काय माझ्या दृष्टीने महत्वाचे फार नाही.

Tags

follow us