Download App

राधाकृष्ण विखेंनीही राम शिंदेंचे कान उपटले ! थेट माध्यमांशी बोलणे…

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil On Ram Shinde : भाजपचे आमदार राम शिंदे यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्याबरोबर मोठे मतभेद असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीच्या कारणातून आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत राम शिंदे यांचे कान उपटले आहे.

आमदार राम शिंदेंनी विखे पिता-पुत्रांवर डागली तोफ ! थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आमदार राम शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गैरसमजुतीतून आरोप केले आहेत. वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांचे थेट माध्यमांशी बोलणे उचित नाहीत. हा पक्षातंर्गत विषय आहे. तो पक्षातंर्गत सोडविला पाहिजे, असेही विखे यांनी म्हटले आहे. राम शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केल्यास आम्ही पक्ष नेतृत्वाला उत्तर देऊ, असे विखे म्हणाले.

‘त्या’ कटाचे देवेंद्र फडणवीसांकडून परमवीर सिंहांना बक्षिस, नाना पटोलेंचा हल्लाबोल

जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड आज झाली. त्यात ईश्वर चिठ्ठीने शिंदे गटाचे शरद कार्ले हे सभापती झाले. तर आमदार रोहित पवार यांच्या गटाचा ईश्वर चिठ्ठीने उपसभापती झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राम शिंदे यांनी विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. खासदार सुजय विखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यांचे सहकार्य अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. विखेंचे पीए आणि त्यांच्या बंधूंनी विरोधात फॉर्म भरला. विखेंनी एक कार्यकर्ता विरोधात उभा केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

Tags

follow us