Radhakrushan Vikhe Patil On NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP)आणि महाराष्ट्राचं (Maharashtra) आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार (Ajit Pawar), कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर कधी जयंत पाटील (Jayant Patil)यांच्या नावानं भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हे सर्व सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
त्यावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ते असे वक्तव्ये करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास भरण्याचं काम करत आहेत.’ अशी प्रतिक्रिया विखे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावर केली आहे.
तसेच पुढे विखे म्हणाले, ‘पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, 2024 च्या निवडणुका या आपण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहोत. तसेच आताही युतीचं सरकार आहे आणि 2024 लाही युतीचच सरकार येईल.’ असं यावेळी विखे म्हणाले आहेत.