Download App

Rahul Gandhi : राहुल गांधींकडे फक्त 55 हजारांची रोख; स्वतःच घरही नाही

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi Portfolio Stock: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिले आहे. राहुल गांधी यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या शेअर्सची तसेच एकूण संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून 4 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शेअर बाजारात 4.3 कोटींची गुंतवणूक केली आहे तर म्युच्युअल फंडमध्ये राहुल गांधी यांनी 3.81 कोटी रुपयांची गुंतणवूक केली आहे. याच बरोबर राहुल गांधी यांच्याकडे दोन बँक खाती असून त्यामध्ये 26.25 लाखांची बचत आहे. तर राहुल गांधी यांच्याकडे रोख रक्कम फक्त 55 हजार रुपये आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना राहायला स्वतःचा घरही नाही.

राहुल गांधी करतात टाटांसह अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांनी टाटाच्या टायटन आणि बजाजसह अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये त्यांनी किती गुंतणूवक केली आहे हे जाणून घ्या.

Pidilite Industries: राहुल गांधी यांनी Pidilite Industries चे 1474 शेअर्स खरेदी केले आहे. त्याची किंमत 42.27 लाख आहे.

Bajaj Finance: Bajaj Finance मध्ये राहुल गांधी यांनी 35.89 लाखांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 551 शेअर्स आहेत.

Nestle India: Nestle India चे राहुल गांधी यांनी 1370 शेअर्स खरेदी केले आहे. त्याची किंमत 35.67 लाख रुपये आहे.

Asian Paints: Asian Paints कंपनीचे राहुल गांधी यांच्याकडे 35.29 लाख किमतीचे 1231 शेअर्स आहेत.

Titan Company: तर टाटाची लोकप्रिय कंपनी टायटनमध्ये राहुल गांधी यांनी 32.59 लाखांची गुंतणवूक केली आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 897 शेअर्स आहेत

Hindustan Unilever: राहुल गांधी यांच्याकडे Hindustan Unilever चे 1161 शेअर्स आहेत. त्यांची किंमत 27.02लाख रुपये आहे.

ICICI Bank: राहुल गांधी यांनी ICICI Bank मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यांनी या बँकेचे 2299 शेअर्स खरेदी केली आहे. ज्याची सध्या किंमत 24.83 लाख रुपये आहे.

Divi’s Laboratory: राहुल गांधी यांच्याकडे Divi’s Laboratory चे 19.7 लाख किमतीचे 567 शेअर्स आहेत.

Suprajit Engineering: राहुल गांधी यांनी Suprajit Engineering या कंपनीचे 4068 शेअर्स खरेदी केले आहे. त्याची किंमत 16.65 लाख रुपये आहे.

Garware Techno Fibers : राहुल गांधी यांनी या कंपनीचे 508 शेअर्स खरेदी केले आहेत. त्याची किंमत 16.43 लाख आहे.

टीम इंडिया पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! ‘या’ संघाविरुद्ध खेळणार 5 सामन्यांची टी-20 मालिका, जाणून घ्या शेड्यूल

म्युच्युअल फंडात गुंतवणूक

प्रतिज्ञापत्रानुसार कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्युच्युअल फंडातही मोठी गुंतणवूक केली आहे. त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने HDFC Small Cap Reg-G, ICICI Prudential Reg Saving-G, PPFAS FCF D Growth, HDFC MCOP DP GR, ICICI EQ&DF F Growth मध्ये गुंतणवूक केली आहे. म्युच्युअल फंडामध्ये राहुल गांधी यांनी 3 कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे.

सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत देखील गुंतवणूक केली आहे. त्यांनी या योजनेत 15.21 लाखांचे बाजार मूल्य असलेले सार्वभौम गोल्ड बाँड खरेदी केले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधींची एकूण संपत्ती 20.4 कोटी असून त्यात 9.24 कोटी जंगम आणि 11.5 कोटी स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.

follow us

वेब स्टोरीज