Download App

Rahul Narvekar : ‘मी अशा दबावाला बळी पडत नाही’; नार्वेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Image Credit: Letsupp

Rahul Narvekar : विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आज नार्वेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आपल्यावरील आरोप हे दबाव टाकण्याचा प्रकार आहे. ज्यावेळी मला या आदेशाबाबत विचारलं त्यावेळी माझ्याकडे त्या आदेशाची प्रत नव्हती. ती संध्याकाळी अपलोड झाली. आता उद्धव ठाकरेंना ही प्रत आधी मिळाली असेल तर त्यांनाच विचारा. उद्या सुनावणी असेल तेव्हा पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल.

दबावाला मी बळी पडत नाही 

विधानभा अध्यक्षांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय करुन घेणं हा यामागचा हेतू आहे. पण मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी जरूर करावा, अशा शब्दांत नार्वेकर यांनी विरोधकांना ठणकावले.

Sanjay Raut : ‘घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच’; सरकारच्या ‘खेळी’वर राऊतांचा संताप

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

याआधी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत नार्वेकरांवर टीका केली होती. नार्वेकर म्हणतात त्या आदेशाची प्रत मिळाली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी.

Tags

follow us

वेब स्टोरीज