Download App

राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर; महायुतीसाठी ठरणार गेमचेंजर ?

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray And Narendra Modi Together : गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरे लवकरच महायुतीसाठी (Mahayuti) प्रचार करताना दिसणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रचारासंबंधीत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर महायुतीच्या उमेदवारासाठी होणाऱ्या जाहीर सभेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) एकाच मंचावर दिसणार असल्याची माहिती अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसात समोर आलेल्या ओपिनियन पोलमध्ये महायुतीसाठी ही लोकसभा निवडणूक कठीण जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. पोलनुसार, राज्यात 48 जागांपैकी महायुतीला 30 जागा मिळू शकतात, यामुळे शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केला. याच बरोबर जे पदाधिकारी महायुतीसाठी काम करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गट मुंबईत पराभव होणार त्यांच्या विरोधात वातावरण आहे . याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंसत मोरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचा चिमटा त्यांनी काढला.

”माढ्यात पवार पॅटर्नची हवा, विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण”

मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

follow us