नागपूर : पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवार (Sharad Pawar) एकटे जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे. शरद पवार यांनी फोडफोडीचं राजकारण सुरु केले. गणेश नाईक, राणे गेले हे शरद पवार यांचं राजकारण असून, जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर सुरुवात झाल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत आहेत. (Raj Thackeray Attack On Sharad Pawar)
चौरंगी शिक्षा अन् कायद्याची भीती, यवतमाळच्या वणीत उमेदवार जाहीर करताना ठाकरेंची ‘राज’ गर्जना
जातीयवादासाठी पवार एकटे जबाबदार
राज ठाकरे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला का? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी निश्चित असे उत्तर दिले. या सर्वाला जातीय वाद आणि फोडाफोडी कारणीभूत असल्याचे ठाकरे म्हणाले. मी माझ्या यापूर्वीच्या जाहीर सभांधूनही सांगत आलो आहे की, या सगळ्या गोष्टींना एकटे शरद पवार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पवारांनी या सर्व गोष्टींची सुरूवात केली असे सांगत जेव्हापासून पुलोद स्थापन झाले तेव्हापासून या गोष्टींना सुरूवात झाल्याचे ठाकरे म्हणाले. संत महापुरुष जाती जातीत कधीच विभागले नव्हते ते 1999 पासून सुरू झाले. हा विषय सगळ्यांनी बंद केला पाहिजे.
इतकं असंवेदनशील सरकार कधीच पाहिलं नाही; भर पावसात सुप्रिया सुळे कडाडल्या..
गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभा निवडणुकीत काढणार
आचार साहिंता लागत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही असे म्हणत दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक लागतील अस वाटतं. मात्र, गेल्या पाच वर्षातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभा निवडणुकीत काढणार असेही ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं, साताऱ्यातील घटना
युपीच्या खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्क्राराची प्रकरण
यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराची प्रकरणं आहेत. सरासरी एका तासाला एक बलात्काराच्या प्रकरणाची नोंद असल्याचे सांगत बलात्काराची प्रकरणं मविआच्या काळातही समोर आली कठोर शासन होत नाही त्यामुळे रोज असे प्रकार सुरु असल्याचे ठाकरे म्हणाले.