Raj Thackery Meeting In Rtanagiri : आज राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अद्याप देखील राज ठाकरे यांनी बारसू रिफायनरीवर राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. यावर आता या जाहीर सभेत राज ठाकरे काय बोलणार हा पाण महत्त्वाच ठरणार आहे.
स्वाभिमानाची पालखी दिमाखात नाचवणाऱ्या कोकणी माणसाच्या समृद्धीसाठी राजगर्जना… ६ मे २०२३, चला रत्नागिरीला !#कोकण_राजगर्जना pic.twitter.com/rMK0q37uSi
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 5, 2023
दरम्यान ही सभा होण्या आधी मनसेकडून या सभेचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये कोणकोणते मुद्दे असू शकतात याची एक झलकच दाखवली आहे. यामध्ये आरोप-प्रत्यारोप, शिव्याशाप सूडभावना, खोके, राजकीय चिखफेक, उठाव, राजीनामा, नाराजीनामा, फोडाफोडी, गद्दारी, गलिच्छ भाषा, बंड असे शब्द टाकत यातून राज ठाकरे यांनी कोणावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेची ओढ का? पवारांनी केली पक्ष नेत्यांची मानसिकता उघड
दरम्यान यामध्ये त्यांनी शेवटी असं देखील म्हटलं आहे की, सर्वच आपापला विचार करत आहेत. किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू असं म्हणत त्यांनी रत्नागिरीमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.