Download App

“…नवऱ्याला गुंड संबोधित केल्याने”, राजा ठाकूरच्या बायकोची संजय राऊतांविरोधात तक्रार

ठाणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली असून, सध्या जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच राजा ठाकूरच्या बायकोनी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली.

राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने बायको पूजा ठाकूर (Pooja Thakur) यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पूजा ठाकूरांनी बोलताना सांगितलं की, “संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केल्याने तक्रार दाखल केली. माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याकडे काय पुरावा आहे. कोणीतरी तुम्हाला संपर्क केली आणि तुम्ही वक्तव्य करत आहात, त्याला अर्थ नाही. तुम्ही पुरावे आणि सर्व गोष्टी समोर आणा.

संजय राऊतांविरुद्ध आयीपीसी कलम २११ आणि कलम १२० ब अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पूजा ठाकूर यांनी यावेळी केली. राज ठाकूर याचं श्रीकांत शिंदेंशी संबंध कसा ? या प्रश्नावर पूजा ठाकूरांनी सांगितलं आहे की, ‘कळवा महापालिका निवडणुकीकरिता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मी निवडणूक लढली. तेव्हा आठवलं नाही, कोणत्या पक्षात आणि गटात होती. पण, यांचं वाद- विवाद वाढत आहेत. माझ्या प्रभागात कामाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदेंच्या नेहमी संपर्कात असते. लोकांचं कार्य आणि मदत करतो, याचा अर्थ असा नाही, की कट रचत आहेत. तसेच, गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असेही पूजा ठाकूर यावेळी म्हणाले.

 

Tags

follow us