Download App

Raju Shetti: बारसूबद्दल बोलू नका, राजू शेट्टींना रत्नागिरीत येण्यास बंदी

Raju Shetti: गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प (Refinery Project Barsu) न होण्यासाठी शेतकरी आंदोलन (Farmers movement) करत आहे. दरम्यान मागील ८ दिवसांपासून अचानक शेतकरी आक्रमक झाले आहेत, बारसू येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी याविरोधामध्ये जोरदार आवाज उठवला आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील सरकारला थेट इशारा दिला होता.

यावरून शेट्टींना रत्नागिरी जिल्हाबंदी (Ratnagiri district ban) तसेच सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post ) करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बारसू प्रकल्पाविषयी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

यामुळे आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाविषयी कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबत राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केले आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी कोणतीही जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याविषयी आणि सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेविषयी विविध चाचण्या घेण्यात येत आहेत.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

शेतकऱ्यांवर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली आहे, त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केला आहे.

Tags

follow us