Download App

केसीआर यांच्याकडून मला CM पदाची ऑफर; राजू शेट्टींचा मोठा दावा

  • Written By: Last Updated:

Raju Shetty : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली अनेकजण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करत आहेत. आणखी बरेच नेते, माजी आमदार, खासदार बीआरएसच्या गळाला लागण्याची शक्यता बोलली जाते. अशातच आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मोठं विधान केलं. बीआरएसकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. (Raju Shetty said I was also offered the post of Chief Minister by BRS)

राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी यांनी सांगितले की, के. चंद्रशेखर राव हे आमचे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. बीआरएस पक्षाकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते आमच्या संपर्कात होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे राज्य असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम्ही तुम्हाला पुढे करू, असं ते म्हणाले होते. तुम्ही आमच्या पक्षात या. केंद्रीय कोअर कमिटीच्या बोर्डाचे सदस्यत्व तुम्हाला देऊ, अशी ऑफर मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून आली होती. पण मला कोणत्याही पक्षात जायचे नसल्याने मी त्यांचा प्रस्ताव नाकारला. कारण, मला पक्षीय राजकारण करायचे असते तर ते याआधीच केले असते. आमची यापूर्वी फसवणूक झाल्यानं मी केसीआर यांनी नकार कळवल्यातं शेट्टी यांनी सांगितलं.

नागपुरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे; गडकरी, फडणवीसांना आमदार लिंगाडेंचा टोला 

दरम्यान, यावेळी बोलतांना राजू शेट्टी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. दहा वर्षांपूर्वी सबका साथ सबका विकास म्हणत गुजरात मॉडेल समोर आणले आणि आमची फसवणूक केली. सबका साथ, सबका विकास तर सोडाच, उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. आता कोणत्याही पॅटर्नमुळं फसवणूक होणार नाही, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे, असं म्हणत शेट्टी यांनी केसीआर यांच्या तेलंगणा पॅटर्नवरही शंका उपस्थित केली. मात्र, केसीआर हे त्यांचा अजेंडा प्रामाणिकपणे राबवला तर त्याबद्दल आम्ही सहानुभूती बाळगू, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

के. चंद्रशेखर राव यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत महाराष्ट्रात दाखल झाले. त्यावरही राजू शेट्टी यांनी भाष्य केलं. अबकी बार किसान सरकार, असे तुम्ही म्हणताय, मग एवढा पैसा तुमच्यकडे आला तरी कुठून ? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवं, असं शेट्टी म्हणाले. शिवाय, पांडुरंग हे महाराष्ट्राचे प्रमुख दैवत आहे. लाखो भाविक आपली भूक-तहान विसरून येथे येतात आणि अशा वेळी के. चंद्रशेखर राव यांच्याकडून करण्यात आलेली जेवणावळी आणि मटणावर मारण्यात आलेला ताव हे पांडुरंगावरील निशिम भक्ती नसून पांडुरंगाची बेगडी भक्ती दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us