Download App

रामनवमी, हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठी; आव्हाडांचं हिंदू सणांबाबत वादग्रस्त वक्तव्य

  • Written By: Last Updated:

Ram Navami, Hanuman Jayanti only to create riots : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एका महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. दरम्यान, आताही आव्हाड यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जणू रामनवमी (Ram Navami), हनुमान जयंती (Hanuman Jayanti) दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते, असं वादग्रस्त विधान आव्हाड यांनी केलं आहे. या प्रकरणी भाजपच्या (BJP) वतीने निदर्शने करत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने काल घाटकोपरमध्ये एक शिबीर झाले. या शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले होते की, औरंगाबादला दंगल झाली. आता रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव दंगलीसाठीच झालाक की, काय असे वाटते. कारण, रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात, त्यामध्ये दंगली होतात. दंगलीमुळं सामाजिक वातावरण विषारी होत आहे. त्यामुळं यंदाचे वर्ष जातीय दंगलीचे आहे. कारण हे सरकार नोकऱ्या देऊ शकत नाहीत. भाव कमी करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही. राजकीय अवमुल्यन झालेले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. सर्वांत सोप काय आहे, असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं.

किसान सभा आक्रमक; महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर राज्यव्यापी पायी मोर्चा

काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. यानंतर छत्रपती संभाजीनगरच वातावरण चांगलचं पेटलं होतं. औरंगाबादच नाव बदलल्याने एमआयएमने संभाजीनगरमध्ये मोठं आदोलन केलं होतं. त्यानंतर रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात भीषण दंगल झाली होती. यावर भाष्य करतांना कालच्या शिबिरात आव्हाडांनी रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झाली आहे, असं विधान केलं.

दरम्यान, आव्हाडांच्या या वक्तव्याचे पडसादआता उमटायला लागले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आज अंधेरी पोलिस ठाण्यासमोर भाजपने निदर्शने केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असी मागणी करण्यात आली. भाजपच्या वतीने तशी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आळी. आता यावर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

 

 

Tags

follow us