Download App

अशाच पाणचट गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा; राम सातपुतेंचा रोहित पवारांना खोचक सल्ला

Ram satpute on rohit pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (rohit pawar)आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांशी पंगा घेतला आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी एक फोटो ट्वीट करुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवारांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर आता भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशाच पाणचट गोष्टींमध्ये आता स्वतःला गुंतवा, तसंही आता हातात शिल्लक काय आहे तुमच्या? असा खोचक सवालही आमदार सातपुते यांनी रोहित पवार यांना विचारला आहे.(Ram satpute criticize on rohit pawar tweet bjp ncp)

मंत्री होताच भुजबळ न्यायालयात; तुरुंगवास भोगावा लागलेला ED चा गुन्हा रद्द होणार?

रोहित पवार यांच्या या ट्वीटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. रोहित पवार यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे. अनेकांनी त्यांचे हे ट्वीट रिट्वीट केले आहे. अनेकांनी लाईक केले आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंटही केल्या आहेत. रोहित पवार यांच्या ट्वीटमध्ये एक मोठा ट्रक दिसत आहे. त्या ट्रकच्या ट्रॉलीमध्ये एक रेल्वेचं इंजिन दिसत आहे. या फोटोवरुन असं दिसत आहे की, हा ट्रक अत्यंत धीम्या गतीने चालत आहे. या फोटोवरुन रोहित पवारांनी भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाही टोला लगावला आहे.


रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते…

‘राज्यात नाही, निदान केंद्रात तरी मंत्रीपद द्या’; शिंदेंच्या आमदाराने करून दिली ‘त्या’ शब्दाची आठवण

जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय… आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल… असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

त्यावर भाजपचे आमदार राम सातपुते यांनी रोहित पवार यांना खोचक प्रत्युत्तर दिले आहे. राम सातपुते यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, अशाच पाणचट गोष्टींमध्ये आता स्वतःला गुंतवा, तसंही आता हातात शिल्लक काय आहे तुमच्या?
मागे सोलापूर मधून कोण तरी तुम्हाला बालिश म्हटलं होतं, आठवतंय ना? असे म्हणून त्यांनी कॉंग्रसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांची पहिलीच टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, काही दिवस जाऊद्या मॅच्युरिटी येईल असं म्हटलं होतं. या गोष्टीची आमदार राम सातपुते यांनी आमदार रोहित पवार यांना आठवण करुन दिली आहे.

Tags

follow us