Rohit Pawar criticizes Ram Shinde’s voter tour ahead of the Ahilyanagar District Bank Election:अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उमेदवारीतून माघार घेतली असली, तरी त्यांची मतदारांची जमवाजमव आणि मोर्चेबांधणी सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. कर्जत तालुक्यातील मतदारांना सहलीसाठी राज्याबाहेर पाठवण्यात आल्याची माहिती राम शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यांच्या या पोस्टवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
दुकाने लुटली, जाळपोळ केली! फ्रान्समध्ये महागाईला आणि कमी पगाराला कंटाळून लोखो लोकं रस्त्यावर उतरली
कर्जतमध्ये कोण उमेदवार आहेत?
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मतदारसंघाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघातून दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पिसाळ तुशार अंबादास, पिसाळ अंबादास शंकरराव, देशमुख देविदास विजयराव, जगताप मंगेश रावसाहेब, गुंड मंजुषा राजेंद्र, शिंदे ज्योती प्रकाश, साळुंके सुरेश भागवत, पाटील किरण आण्णासाहेब, तापकिर काकासाहेब लक्ष्मण आणि शेवाळे कैलास शंकरराव यांचा समावेश आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उमेदवारीतून माघार घेतली असली, तरी त्यांच्या गटाकडून कर्जतमध्ये कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांच्या गटाकडून कोणाला संधी मिळणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील या मतदारसंघातील पुढील राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
राम शिंदेंनी मोठ्या संख्येने मतदार सहलीला घेऊन मोर्चेबांधणी केली
राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील मतदारांची जमवाजमव करत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे. त्यांच्या पोस्ट केलेल्या माहितीनुसार, सध्या 45 मतदार सहलीसाठी रवाना झाले असून आणखी 15 मतदार सोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण 60 मतदारांचे गणित मांडले जात आहे. उमेदवारीतून माघार घेतल्यानंतरही राम शिंदे यांची या निवडणुकीतील सक्रियता चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्य सरकारचा खर्चावर अंकुश; सर्व विभागांना 20 टक्के निधी कपातीच्या सूचना, दुष्काळासाठी निधी वळवणार?
रोहित पवार यांचा उमेदवार कोण?
कर्जत तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी रोहित पवार यांच्या गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या उमेदवारांबाबत उत्सुकता कायम आहे. उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच कर्जत तालुक्यातील निवडणुकीचे राजकीय गणित समोर येईल.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मतदारांना सहलीसाठी राज्याबाहेर रवाना करण्यात आले.
– एकूण मतदार : ७५
– उपस्थित मतदार : ४५
– लवकरच १५ मतदार जॉईन होणार
– एकूण ६० मतदार सहलीला जाणार#Ahilyanagar #AhilyanagarDistrictBank https://t.co/dobisNZ21j
— Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde) October 17, 2026
राम शिंदेंच्या पोस्टवर रोहित पवारांची टीका
राम शिंदे यांनी मतदार सहलीसंदर्भात केलेल्या पोस्टवर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. “विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीने ट्वीट करून सांगण्यासारखी अभिमानास्पद गोष्ट आहे का ही? ज्याची लाज वाटायला पाहिजे ती बाब हे महोदय मिरवतात… आता लोकांनाच याची लाज वाटतेय,” असे त्यांनी म्हटले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान; 25 जागांसाठी महायुती-मविआत चुरस, उद्या निकाल
पुढे भाजपवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले, “सत्ता आणि पैशांच्या बळावर राज्याचं राजकारण भाजपने कोणत्या थराला नेऊन ठेवलं, याचा हा उत्तम नमुना.” राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सत्तेसाठी घोडेबाजाराला चालना दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीने ट्वीट करून सांगण्यासारखी अभिमानास्पद गोष्ट आहे का ही?
ज्याची लाज वाटायला पाहिजे ती बाब हे महोदय मिरवतात… आता लोकांनाच याची लाज वाटतेय.सत्ता आणि पैशांच्या बळावर राज्याचं राजकारण भाजपने कोणत्या थराला नेऊन ठेवलं, याचा हा उत्तम नमुना.. बळीराजा दुष्काळात होरपळतोय आणि एका सत्तेतून दुसरी सत्ता मिळवण्यासाठी हे घोडेबाजाराला चालना देतायत..!
#महाराष्ट्र_राजकारण #शेतकरी #दुष्काळ #सत्तेचे_राजकारण #लोकशाही
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 18, 2026
दरम्यान, एकीकडे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे राम शिंदे यांच्या मतदार सहलीच्या पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आता कर्जत तालुक्यातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोणत्या गटाचे पारडे जड ठरणार आणि जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
