Download App

राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का; बाजार समितीच्या रणधुमाळीत तालुकाध्यक्षच फोडला !

  • Written By: Last Updated:

Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात बाजार समितीच्या निवडणुकीत जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राम शिंदे यांनी रोहित पवारांना एक मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर हे भाजपमध्ये आले आहेत. त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे यांनी उमेदवारीही दिली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी 1.54 कोटींची अवैध रोकड जप्त

रोहित पवारांबरोबर ठाकरे गटालाही राम शिंदे यांनी धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे बळीराम यादवही ही भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. राम शिंदेंचा हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रोहित पवारांना सोडून जात आहे, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपप्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार सहकारी सोसायटी मतदारसंघातून – मंगेश जगताप, अभय पाटील, काकासाहेब तापकीर, प्रकाश शिंदे, रामदास मांडगे, भरत पावणे, नंदकुमार नवले, महिला राखीव – विजया गांगर्डे, लिलावती जामदार, ग्रामपंचायत मतदार संघ – सुरेश मोढळे, बलिराम यादव, अनुसूचित जाती/जमाती – बाळासाहेब लोंढे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – सभाजी बोरुडे, इतर मागासवर्गीय – नितीन पाटील, व्यापारी/आडते मतदार संघ – अनिल भंडारी, कल्याण काळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती- लहू वतारे, हमाल-मापाडी मतदार संघ – बापूसाहेब नेटके आदिंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

अदानी पवारांचा सल्ला घ्यायला गेले असतील; पृथ्वीराज बाबांची खोचक टीका

जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलचे सोसायटी मतदार संघ- गौतम उतेकर, तुषार पवार, गणेश लटके, सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, जालिंदर चव्हाण, मच्छिंद्र गिते, ग्रामपंचायत मतदार संघ – वैजीनाथ पाटील, शरद कार्ले, अनुसूचित जाती-जमाती- सिताराम ससाणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – नंदकुमार गोरे, महिला राखीव – शारदा भोरे, सुरेश शिंदे, हमाल-मापाडी मतदार संघ – रविंद्र हुलगुंडे, विमुक्त जाती-भटक्या जमाती – अशोक महारनवर आदींची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

Tags

follow us