Download App

Ramdas Athawale : एकनाथ शिंदे मजबूत माणूस, ते रडणाऱ्यातले नाहीत, आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे

  • Written By: Last Updated:

Ramdas Aathawale said Aditya Thackeray’s allegations against Eknath Shinde are false : नऊ महिन्यांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात शिंदे-फडणीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच काल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackera) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे मजबूत माणूस आहेत, ते रडणाऱ्यातले नाहीत. आदित्य ठाकरेंचा आरोप अत्यंत चुकीचा आहे, असं आठवले म्हणाले.

आठवले हे पुण्यात गिरीश बापट यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे हा मजबूत माणूस आहे. ते रडणाऱ्यातले नाहीत. ते खरे शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी आहेत. त्यामुळं ते रडणार नाहीत. आदित्य ठाकरेंचा आरोप हा खोटा आहे. उध्दव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली होती. आणि ही युती एकनाथ शिंदेंना मान्य नव्हती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं. आदित्य ठाकरे सांगत आहेत की, एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला घाबरून ते भाजपसोबत गेले आणि मातोश्रीवर रडले. पण, आदित्य ठाकरेंच्या आरोपात कुठलंही तथ्य नाही. ते खोटं बोलत आहेत, अशी टीका आठवले यांनी केली.

“मिसिंग लिंक” वर पुण्यात काम चालू आहे; एकनाथ शिंदेकडून राजकीय इशारा

काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार बाद होणार असून अजित पवारही भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पत्रकारांनी अजित पवार नाराज असून अपात्र आमदारांना घेऊन ते भाजपसोबत येणार का, असं आठवलेंना विचारले. त्यावर बोलतांना आठवले म्हणाले की, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आजवर काम केलं. पवारांनी अजित पवारांना अनेक पदे दिली. मध्यंतरी ते नॉटरिचेबल होते. पण ते भाजपसोबत जाणार नाहीत. नॉटरिचेबल असल्याचं कारणही त्यांनी सांगिलतं होतं. ते आजारी होते, म्हणून नॉटरिचेबल होते. मात्र, चर्चा अशी आहे की, ते भाजपात जातील. मात्र, अजित पवार भाजमध्ये जातील, असं मला तरी वाटत नाही, असं आठवले यांनी सांगितलं.

आठवले म्हणाले की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यापूर्वी दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की, एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील. पण, उध्दव ठाकरेंना कंटाळून ते गेले. त्यामुळं राजकारणात कधी काहीही होऊ शकतं. त्यामुळं ते अजित पवार हे भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे. मात्र, ते भाजपता येण्याची शक्यता कमी आहे, असं मला वाटत असल्याचं आठलेंनी सांगितलं.

काल एका कार्यक्रमात बोलतांना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील राचकीय परिस्थितीव भाष्य करतांना एकनाथ शिंदे यांच्याबदद्ल खळबळजनक दावा केला होता. हे 40 आमदार त्यांच्य स्वत:च्या जागांसाठी आणि पैशासाठी भाजपसोबत गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं काही कारणचं नव्हतं. ई़डी आणि सीबीआय अटक करेल म्हणून एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर रडले होते. भाजपसोबत चला नाहीतर मला अटक होईल, असं ते म्हणाले होते, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. त्यावर आठवलेंनी हा आरोप खोटा असल्याचं सांगितलं. दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us