‘जरांगे घाबरले आहेत, म्हणून माझ्याकडे बोट दाखवत आहेत’; रामदास कदमांचा पलटवार, म्हणाले, ‘माझ्याकडे खूप मसाला आहे…’

Ramdas Kadam on Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच ते माझ्याकडे बोट दाखवत आहेत,' असा पलटवार रामदास कदमांनी केला.

Ramdas Kadam hits back at Manoj Jarange over the Rs 500 crore audio clip row

Ramdas Kadam hits back at Manoj Jarange over the Rs 500 crore audio clip row

Ramdas Kadam hits back at Manoj Jarange over the Rs 500 crore audio clip row: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात रामदास कदम यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता कदम यांनी जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच ते माझ्याकडे बोट दाखवत आहेत,’ असा पलटवार त्यांनी केला. तसेच, ही ऑडिओ क्लिप आपल्यापर्यंत कधी पोहोचली, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीने जरांगे यांच्याकडील ऑडिओ क्लिपची पेनड्राइव्ह ताब्यात घेतली आहे.

संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होणार; किरेन रिजिजूंची मोठी घोषणा!

रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिपबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, ‘तुमची पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती. ही क्लिप माझ्याकडे दुसऱ्याच दिवशी आली. त्यानंतर मी त्यावर बोललो. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काय संबंध आहे, हे चौकशीत स्पष्ट होईल.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इतकंच नाही तर कदम यांनी सूचक विधान करत या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला. ‘माझ्याकडे खूप काही मसाला आहे; पण सध्या मला काही बोलायचं नाही. चौकशीत जे काही आहे ते निष्पन्न होईल,’ असं ते म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे सत्य समोर येईल, असंही कदम यांनी स्पष्ट केलं.

जरांगेंनी रामदास कदमांवर काय आरोप केले?

मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये भाजपकडून 500 कोटी रुपये घेण्यात आल्याचा आणि ही रक्कम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

टाटा सन्समधील वाद कोर्टात; चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे आव्हान, उद्या सुनावणी!

या प्रकरणावरून जरांगे यांनी रामदास कदम यांच्यावरही संशय व्यक्त केला. ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करताना रामदास कदम यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या क्लिपशी कदम यांचा काय संबंध आहे आणि त्यांच्याकडे ही क्लिप कशी पोहोचली, याची चौकशी व्हावी, अशी जरांगेंची भूमिका आहे.

दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. बुधवारी एसआयटीचं पथक अंतरवाली सराटी येथेही दाखल झालं होतं. आता रामदास कदम यांनी केलेल्या पलटवारानंतर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

‘मी कोणाची लेक आहे, हे विसरू नका’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

Exit mobile version