Download App

अजितदादांनी फक्त सांगावं, ‘मी’ बारामतीतून लढण्यास तयार… : महादेव जानकरांचा शड्डू

नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आम्हाला कोणीही पाठिंबा दिला तरी त्याचे स्वागतच आहे. मग तो अजितदादांनी देऊ दे, भाजपने देऊ दे, मोदी साहेबांनी देऊ दे किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊ दे. आमची फक्त एकच अट आहे की, आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी बारामतीत लढणारच असल्याचे स्पष्ट केले. ते हिवाळी अधिवेशनादरम्यान, लेट्सअप मराठीशी विशेष संवाद साधताना बोलत होते. (Rashtriya Samaj Party chief Mahadev Jankar clarified that he will contest from Baramati Lok Sabha constituency)

राज्यातील 48 मतदारसंघात तयारी सुरु आहे. मी आमच्या संसदीय समितीला सांगितले आहे की परभणी, माढा, बारामती मला पाहिजे. पण या समितीने मला अजून काही सांगितलेले नाही. ते मला मिर्झापूरमधूनही तयारी करायला लावत आहेत. देशभरातील 543 जागांपैकी किमान 500 जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. सर्व ठिकाणी आम्ही विजयी होऊ असे मी म्हणणार नाही. पण आमचा मतांचा टक्का वाढला तर आम्हाला पुढच्या पंचवार्षिकला फायदा होऊ शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us