Download App

Raju Shetti : रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील…

  • Written By: Last Updated:

मुंबई : ‘रावण धनुष्य उचलू शकला नाही. त्याचा अपमान झाला. नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. पण कलियुगातल्या रावणाने यातून बोध घेतला. त्याने पहिले रामायण घडवलं. मग सत्ता पळवली आणि मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रूपात येतील. त्या वेळीच हे रामायण पुर्ण होईल. अशी मला खात्री आहे.’ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. या निर्णयावर अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयावर दिली आहे.

केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपने साथ दिली. शिंदे यांचा वापर करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडले. आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेंकडे गेल्याने ठाकरे यांन राजकीयदृष्ट्या धक्का देण्यात भाजपला यश आले आहे. राजकीयदृष्ट्या बुलडोझरच फिरविण्यात आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Amit Shah : भाजपचे चाणक्य अमित शहा नागपूरात दाखल; असा असणार शहांचा महाराष्ट्र दौरा

राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं होते. दरम्यान, सत्तास्थापनेनतंर शिवसेना कुणाची? हा वाद उफाळून आला होता. या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप घेतला असून सत्यमेव जयते ऐवजी असत्यमेव जयते, असे म्हणावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

त्यानंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags

follow us