Download App

‘दादा डोईजड, भाईंचे पंख छाटण्यासाठी…’ फडणवीसांनी स्वत:चा खास अधिकारी नेमला; रोहिणी खडसेंनी सरकारला डिवचले

Rohini Khadse Criticized Devendra Fadnavis : चैत्यभूमीवर काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भाषणे झाली. मात्र या कार्यक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अन् अजित पवार (Ajit Pawar) यांची भाषणे वगळल्याचं समोर आलं. पाहायला मिळाले. आदल्या रात्रीच ही भाषणं वगळली, अशी माहिती यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिली. तर यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी (Rohini Khadse) महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक पोस्ट केलीय. त्यांनी म्हटलंय की, दादा डोईजड होत असल्यामुळे आधी मंत्रालयातील फाईली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी (Maharashtra Politics) आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीमधये-पालकमंत्री पदात भेदभाव केला.

नादच नाय करायचा! ‘पोराचा बाजार उठला रं… ‘ झापुक झुपूकचं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

पुन्हा रायगडावर दादांना डावलून भाईंना बोलण्याची संधी दिली. मात्र, भाई 2 पाऊल पुढचे निघाले… मोटा भाय मुंबईत आल्यावर एकटेच जाऊन पाऊण तासाची मीटिंग करून आले… मग लक्षात आलं भाई पण जास्तच पुढे पुढे करत आहेत… मग दोघांना जागेवर आणण्यासाठी थेट भाई – दादांचे चैत्यभूमीवरील भाषण कापून टाकले… एकंदरीत काय…. तर सरकार कसं चालू आहे? प्रचंड ओढाताण, प्रचंड रस्सीखेच… एकमेकांच्या पायात… आज नाहीतर उद्या अडखळून पडणार असल्याचं भाकित देखील खडसे यांनी केलंय.

दरम्यान रोहिणी खडसे यांनी 14 एप्रिल रोजीच्या राज्यपालांच्या कार्यक्रमाची राजभवनाने जारी केलेली प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. या प्रतीमध्ये दोन्ही उपमुख्यंत्र्यांच्या भाषणाचा उल्लेख स्पष्टपणे दिसत आहे.

ठाकरेंची वाघीण देणार पिता-पुत्रांना मोठा धक्का; ‘राजकीय घटस्फोट’ घेत करणार दादांच्या पक्षात प्रवेश?

रोहिणी खडसे यांनी अजित पवार अन् एकनाथ शिंदे यांना डावलण्यात येत असल्याचं म्हटलंय. त्यासाठी या दोघांचे चैत्यभूमीवर होणारे भाषणच कापून टाकले. प्रचंड ओढाताण अन् रस्सीखेंच करत सरकार चालत असल्याचं देखील खडसे यांनी म्हटलंय. तर महायुती एकमेकांच्या पायात अडखळून पडणार, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला आहे.

 

follow us