Rohit Pawar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडेच लागले आहे. दुसरीकडे राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस लांबला आहे. खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्याचबरोबर त्या-त्या भागातील जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर उपस्थित होताना पाहायला मिळतोय, मात्र याकडं राज्य सरकारचं (state government)दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.(NCP Rohit Pawar advice state government devendra fadnavis ajit pawar karjat jamkhed Constituency)
भुजबळ, मुश्रीफ मंत्री झाल्यावर सोमय्या पहिल्यांदा माध्यमांसमोर; म्हणाले, मी माझं…
राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला एक खोचक सल्ला दिला आहे. पवार म्हणाले की, राज्यातील काही भागांमध्ये पाऊस लांबला आहे. त्यामुळे त्या त्या भागामध्ये जनावरांच्या चारा-पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची राजकीय फोडाफोडी झाली असेल तर राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडेही शासन म्हणून थोडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे आता रोहित पवारांनी अनेक दिग्गज नेत्यांचा रोष ओढवून घेतला आहे, हे देखील तितकच खरं आहे. आगामी काळातील निवडणुकीत आपल्या मतदारसंघात अनेकजण आपल्या विरोधात फोडाफोडी होणार असल्याचेही रोहित पवार यांनी बोलून दाखवले आहे.
12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; पंकजा मुंडे, रामदास कदम, हर्षवर्धन पाटलांचा वनवास संपणार?
कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही गावांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील स्थानिक प्रतिनिधी, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाण्यासाठी टॅंकर सुरु केले आहेत. कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये कायमच पावसाचं प्रमाण कमी असतं, त्यातच आता काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने पाण्याचे टॅंकर सुरु केले आहेत.
त्यावर बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, यंदा जुलै महिना निम्मा संपत आला तरी राज्याच्या विविध भागांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस पडलेला नाही. माझ्याच मतदारसंघामधील अनेक गावामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरु केलेला आहे. राज्यात अनेक गावांमध्येही स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींकडून तर कुठं व्यक्तीगत पातळीवर टँकर सुरु केले जातायेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळं राजकीय फोडाफोडी झाली असेल तर आता राज्यातील हे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याकडं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, अशी फेसबुक पोस्ट टाकून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
जुलै महिना निम्मा संपत आला आहे. तरीदेखील अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत 47 टँकर सुरु आहेत. यापुढेही काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात 17 टॅंकर सुरु आहेत. संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी 10 टॅंकर सुरु आहेत. त्याचबरोबर नगर तालुक्यात 9 टॅंकर तर अकोले तालुक्यात 1 टॅंकर सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.