Rohit Pawar Explain on his allegation on Congress is B team of BJP after Balasaheb Thorat Replay : अहिल्यानगरमधील जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress) आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) प्रचंड संतप्त झाले होते. त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली होती. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला होता. त्यानंतर आता पुन्हा थोरात साहेबांविषयी तक्रार नाही म्हणत आपल्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
थोरात यांनी पलटवार केल्यानंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar ) एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, ‘मा. थोरात साहेब आपला इंटरव्ह्यू बघितला.. आपल्याविषयी काहीही तक्रार नाही, कायमच आदरच आहे, पण ज्यांनी माझ्याविरोधात प्रा. राम शिंदे यांचा प्रचार केला त्यांनाच काँग्रेसने (Congress) पदं दिली. त्यांचे हे फोटो आपण आवर्जून बघा.. यांचे आपल्यासोबत कमी पण भाजप नेत्यांसोबतच अधिक फोटो आहेत. शिवाय काँग्रेसने ज्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तो आहे भाजप आमदाराचा कार्यकर्ता. ज्याने आष्टी विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराविरोधात काम केलं.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpermalink.php%3Fstory_fbid%3Dpfbid022Axcz9QKXRGXeUyZzjsRRftaoCLd2RCv9RdykruC1tPTnryt5FJakopXMo8Jnq8vl%26id%3D100044164193097&show_text=true&width=500″ width=”500″ height=”250″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share”></iframe>
मोटरमनला भरधाव एक्स्प्रेसची धडक; जागीच मृत्यू, मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर दुर्घटना
असं असेल तर हे लोक भाजपाची बी-टीम नाही का? आणि आपणच सांगा अशा घरभेद्या ‘बी-टीम’ सोबत मी चर्चा कशी करणार? आश्चर्य याचं वाटतं दिल्लीत मा. राहुल जी गांधी हे भाजपाविरोधात ताकदीने दोन हात करतात आणि इकडं गल्लीत मात्र काँग्रेसच भाजपाच्या हातात हात घालतोय.. हे कितपत योग्य आहे?‘ असा सवाल रोहित पवारांनी (Rohit Pawar ) केला आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
रोहित पवारांच्या (Rohit Pawar ) जामखेडमध्ये काँग्रेस हीच भाजपची बी– टीम असल्याच्या आरोपांवर पलटवार करताना थोरात म्हणाल की, कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीपासूनच काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवारांबद्दल नाराजी आहे. कारण ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाहीत. त्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांच्या परस्पर निर्णय घेताता. याची पूर्वकल्पना देत आम्ही त्यांना सांगितले होते की, काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधा, चर्चा करा. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपलं अस्तित्त्व टीकवण्याचा प्रयत्न आताच्या निवडणुकीमध्ये केला. असं म्हणत थोरातांनी जामखेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.
